1 वास्तुशास्त्राचा उगम व विकास Origin and Development of Vastushastra
1 वास्तुशास्त्राचा उगम व विकास प्रस्तावना वास्तुशास्त्र हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे कला व शास्त्र असून, घर, मंदिरे, राजवाडे, कार्यालये, शॉप, व्यावसायिक, औधोगिक आणि इतर वास्तूंच्या योग्य नियोजनासाठी वापरले जाते. या शास्त्राचा उगम हजारो वर्षांपूर्वी झाला असून, त्याचा विकास विविध काळांमध्ये विविध तत्त्वज्ञान आणि संकल्पनांद्वारे झाला आहे. या प्रकरणात वास्तुशास्त्राचा उगम आणि विकास याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत . १. वास्तुशास्त्राचा उगम Origin of Vastushastra वास्तुशास्त्राचा उगम वेदांमध्ये झाला असे मानले जाते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यामध्ये वास्तुशास्त्राशी संबंधित अनेक संकल्पना आणि नियम नमूद केलेले आहेत. विशेषतः अथर्ववेदात वास्तूची योजना, दिशांचे महत्त्व आणि इमारतींच्या उभारणीविषयी उल्लेख आढळतो. तसेच याचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा आढळतो. पुराणांमध्ये वास्तुशास्त्राचा उल्लेख: विष्णु पुराण – या ग्रंथात दिशांचे महत्त्व, भूमी निवड आणि वास्तुशास्त्राचे नियम दिलेले आहेत. योग्य दिशेत आणि समतल भूमीवर घर बांधल्यास समृद्धी आणि सुख...